घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण ; लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे : सभापती प्रा. राम शिंदे

महाआवास अभियान २०२४- २५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. कर्जत- जामखेड तालुक्यातील लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहावे व राज्य शासनाच्या अभियानात सहभाग घ्यावा. उपस्थित लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम, साहित्य आणि अन्य संबंधित विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी वेळेत घरकुल बांधकाम पूर्ण केल्यास उद्दिष्ट पूर्ण होण्यास […]

Continue Reading

दोघांचा बळी ; विहीर मालकासह ट्रॅक्टर चालक व मॅक्झिन मालकावर गुन्हा दाखल

कर्जत शहराजवळील म्हेत्रे मळा येथे विहिर फोडण्यासाठी केलेल्या स्फोटादरम्यान उडालेल्या दगडांमुळे अनेकजण जखमी झाले. यामधील एका तरुणाचा लगेचच मृत्यू झाला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात विहीर मालक, ट्रॅक्टर चालक व मॅक्झिन मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास म्हेत्रेमळा येथे गणेश […]

Continue Reading

शिवजयंतीनिमित्त कर्जत लाईव्ह आयोजित तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा. किरण जगताप संपादित ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत तालुक्यातील विद्यालयांमध्ये आठवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका निलम देवरे यांनी केले. या स्पर्धेचा निकाल असा : अनुराधा रामचंद्र वाळुंज ( सौ. सो. […]

Continue Reading

खोदकाम करताना जिलेटीनचा स्फोट ; चौघे गंभीर

खोदकाम करताना जिलेटिनचा अचानक स्फोट होऊन झालेल्या अपघातात कर्जत तालुक्यातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. कर्जत – थेरवडी मार्गालगत कुकडी कॅनल पट्टीजवळ खोदकाम सुरू होते. काम सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी जिलेटिनचा अचानक स्फोट झाला. चौघेही त्याच कामात असल्याने या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धावत जाऊन मदतकार्य केले. […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कर्जतमध्ये विविध कार्यक्रम

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त कर्जतमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांनी दिली. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात येणारे भव्य डेकोरेशन हे लक्षवेधी ठरणार आहे. या ठिकाणी लाईट शो आणि आकर्षक विद्युत रोषणाईचे देखील उभारण्यात येत आहे. दि. १९ फेब्रुवारी […]

Continue Reading

माऊली पेट्रो स्टेशनमध्ये फ्री नायट्रोजन सेवा उपलब्ध

कर्जत- राशीन रोडलगत नव्याने सुरू केलेल्या माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत यांनी ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर सुरु केली आहे. या पेट्रो स्टेशनमध्ये फ्री नायट्रोजन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.कर्जत शहरात व इतर ठिकाणी नायट्रोजनचे प्रती चाक १० ते २५ असा दर आकारला जातो. मात्र, माऊली पेट्रो स्टेशनमध्ये पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना […]

Continue Reading

अपघाताची बातमी अन् काळजात धडकी !

कुणाचातरी अपघात झाल्याची बातमी धडकते आणि काळजात धडकी भरते. सकाळी घरातून कामानिमित्त बाहेर पडलेला माणूस अपघातात गेल्याची दुर्दैवी बातमी त्याच्या घरच्यांना जेव्हा ऐकायला मिळत असेल तेव्हा ते त्यांच्यासाठी किती धक्कादायक असेल याची कल्पना सुद्धा निशब्द करणारी आहे. रोज अशा कितीतरी घटना ऐकून सुन्न व्हायला होतेय. या रस्ते अपघातांच्या वाढत चाललेल्या मालिकांमुळे माणसांचे मरण भयंकर स्वस्त […]

Continue Reading

‘कर्जत लाईव्ह’तर्फे शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील विद्यालयांमध्ये आठवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धकांनी आडवा कॅमेरा धरून शांततामय वातावरणात ३ ते ५ मिनिट कालावधीपर्यंतच्या भाषणाचा व्हिडिओ तयार करून ७०३०९५२२७५ या व्हाट्सअप नंबरवर पाठवावा. सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ ही व्हिडिओ पाठविण्याची […]

Continue Reading

शिवजयंतीनिमित्त कर्जत शहरात विविध उपक्रम ; जोरदार तयारी सुरु

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्जत येथे हा सोहळा पार पडणार आहे. या उत्सवात मर्दानी खेळ, ढोल पथक, मिरवणूक रथ, नटराज बँड, विंचुर बँड, लेझीम पथक, भजनी मंडळ, हलगी पथक अशा विविध आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन […]

Continue Reading

कर्जतमधील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या तत्पर सेवेमुळे रुग्णाला मिळाले जीवनदान !

अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा ठरत असलेल्या कर्जत येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत गंभीर अवस्थेतील रुग्णाला नवजीवन दिले. अतिदक्षता उपचार व तातडीच्या वैद्यकीय सेवेमुळे रुग्णाचा जीव वाचला. कीटकनाशक सेवन केल्यामुळे गंभीर परिस्थितीत दाखल करण्यात आलेल्या गोकुळ हरिदास बनकर, वय ३६, रा. मिरजगाव यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. […]

Continue Reading