अवैध दारू विक्रीप्रकरणी नांदगावमधील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे एका ६७ वर्षीय महिलेविरुद्ध अवैध दारू विक्रीप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेदा हुसेन सय्यद, वय ६७ वर्षे असे दारू विक्री करणाऱ्या महिलेचे नाव आहे. नांदगाव गावाच्या शिवारात गावठाण येथे घराच्या भिंतीच्या आडोशाला एक महिला देशी, विदेशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली. […]

Continue Reading

किरकोळ कारणावरून मारहाण ; जीवे मारण्याची धमकी

कर्जत तालुक्यातील बेलवंडी येथील महेश दत्तात्रेय राक्षे यांनी त्यांचे चुलते संजय पोपट राक्षे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तू आमच्या कार्यक्रमांमध्ये का येत नाही. तू एवढा मोठा झाला का ? असे म्हणत त्यांनी महेश राक्षे यांना २२ जानेवारी रोजी सकाळी अडवून ऊसाने मारहाण केल्याचा आरोप महेश राक्षे यांनी केला आहे. याबाबत […]

Continue Reading

पत्रकार गणेश जेवरे, पत्रकारांचा भांडाफोड कधी करणार ?

कर्जत तालुक्यातील पत्रकारांमध्ये वयाने काहीसे ज्येष्ठ असलेल्या आणि कर्जत शहरात राहणाऱ्या पत्रकार गणेश जेवरे यांनी जी न्यूजच्या माध्यमातून ‘नसीर हुसेन सय्यद नावाचा कर्जतमधील ब्लॅकमेलर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. या बातमीमध्ये त्यांनी प्रतिष्ठित लोकांच्या नावाने खोट्या तक्रारी देऊन त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा धंदा सुरू असून त्याचा म्होरक्या नसीर सय्यद असल्याचे म्हटलेले आहे. सय्यद हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे […]

Continue Reading

सभापती प्रा. राम शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये सामाजिक उपक्रम

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कर्जत येथे भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाई हॉस्पिटल व विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून हे शिबिर घेण्यात येत आहे. शिबिराचे हे दहावे वर्ष आहे. बुधवार, दि. १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कुळधरण रोड, कर्जत येथील विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल […]

Continue Reading

दुधोडी – सिद्धटेक रस्त्याचे काम त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलन : बाळासाहेब कोऱ्हाळे

कर्जत तालुक्यातील दुधोडी ते सिद्धटेक रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून बंद आहे, यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील प्रवास खडतर व धोकादायक झाला आहे. रस्त्याचे काम अचानक थांबण्यामागील कारणे अस्पष्ट असली, तरी काहीतरी दबाव असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. […]

Continue Reading

कर्जतमध्ये प्रवीण घुलेंनी केली गोदड महाराजांच्या मूर्तीची स्थापना

कर्जत शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या मूर्तीची स्थापना (सदगुरू याग) मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या मंगलप्रसंगी पै. प्रवीण घुले पाटील यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी धार्मिक विधी व महापूजा सोहळा थाटामाटात पार पडला. मंदिरात उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला. या […]

Continue Reading

अळसुंदे विद्यालयास सीसीटीव्ही कॅमेरा संच भेट

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलसाठी माजी विद्यार्थी प्रमोद भागवत अनारसे यांच्या वतीने २७५०० रुपये किमतीचे पाच मेगापिक्सेलचे आठ सीसीटीव्ही कॅमेरा संच फिटिंगसह भेट देण्यात आले. प्रमोद अनारसे हे हैदराबाद येथील कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत तसेच अळसुंदे गावातील प्रगतशील शेतकरी भागवत नारायण अनारसे यांचे सुपुत्र आहेत. विद्यालयाचे गुरुकुल, सांस्कृतिक […]

Continue Reading

‘भाडखाऊ’ सार्वजनिक बांधकाम विभागाची झालीय कोंडी, मुदतीआधी फ्लेक्स काढला तर ते बसतील बोकांडी ?

कर्जत- राशीन- खेड महामार्गावर प्रवाशांच्या माहितीसाठी दिशादर्शन होण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा खर्च केला. परंतु, या फलकांचा मूळ उद्देश पूर्ण न होता, त्यावर अभिनंदन संदेश, राजकीय नेत्यांच्या छायाचित्रांसह जाहिराती दिसून येत आहेत. यामुळे प्रवाशांना आवश्यक माहिती मिळत नाही, आणि फलकांवरील माहितीचा हेतू साध्य होताना दिसत नाही. ‘कर्जत लाईव्ह’च्या माध्यमातून प्रवाशांच्या या प्रश्नावर आवाज […]

Continue Reading

कर्जतच्या मस्तीखोर बांधकाम विभागामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात !

कर्जत- राशीन- खेड महामार्गावरील साईड पट्ट्यांची दुरवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे या मार्गावर अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साईड पट्ट्यांवर अनेक ठिकाणी मोठ्या आकाराचे दगड गोटे पडलेले असून त्यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी साईड पट्ट्या खचल्या आहेत, तर काही ठिकाणी खोल चाऱ्या पडलेल्या आहेत. साईड पट्ट्यांच्या या दुरावस्थेमुळे […]

Continue Reading

जबाबदारीची शिखरे पादाक्रांत करणारे नेतृत्व : आ. प्रा. राम शिंदे

प्रा. राम शिंदे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिकता, साधेपणा आणि विकासशील नेतृत्वाचे प्रतीक आहे. ग्रामीण भागात जन्माला आलेल्या या नेतृत्वाने आपल्या कर्तृत्वाने राज्याच्या राजकारणात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या विधान परिषदेच्या सभापतीपदी होत असलेल्या निवडीने केवळ त्यांचे राजकीय कर्तृत्वच सिद्ध केले नाही, तर त्यांच्या नेतृत्वगुणांना एक नवी ओळख दिली आहे. जामखेड तालुक्यातील शेतकरी कुटुंबात वाढलेल्या […]

Continue Reading