मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, समूह साधन व्यक्ती, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान समारंभ जामखेड येथे पार पडला. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते यावेळी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता-भगिनींचे आ. शिंदे यांनी आभार मानले. त्यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक महिलांच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ही योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचत आहे, आणि यापुढेही आपण अशीच साथ द्यावी, असे आ. शिंदे यांनी यावेळी आवाहन केले. समारंभात उपस्थित कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या अनुभवांची मांडणी केली आणि या योजनेमुळे महिलांना मिळणाऱ्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
वैभव पवार, कर्जत तालुका प्रतिनिधी