आ. रोहितदादांचे नेतृत्व हे महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने उभरते नेतृत्व असून त्यांचे कार्य हे युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. कर्जत- जामखेडमधील सर्व युवा वर्ग रोहितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ७२ वर्षांनी मतदारसंघातील सर्व घटकांच्या अडीअडचणीची जाण असणारे नेतृत्व प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघास लाभले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ओमप्रकाश विनायक गोसावी यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात दादांनी युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी केलेले काम खूप प्रशंसनीय असून त्या कामाची पोचपावती कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार रोहितदादांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देणारच आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात यत्किंचितही शंका नाही. आमचा कर्जत- जामखेड मतदारसंघातील सर्व युवावर्ग दादांच्या अंगी असणाऱ्या नेतृत्वगुणांमुळे व पवार साहेबांसारखीच झपाटल्यासारखे काम करण्याची क्षमता अंगी असल्यामुळे रोहितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो.
येणारे सरकार हे निश्चितच महाविकास आघाडीचे असणार आहे व त्यामध्ये दादांना मिळणारी जबाबदारी ही खुप मोठी असणार आहे याची मतदार संघातील सर्वांना खात्री आहे आणि त्यामुळे मतदारसंघाचा जो विकास होणार आहे त्याचा झपाटा खुप प्रचंड असणार आहे. आपल्या विचारांचे सरकार नसताना दादांनी मागील अडीच वर्षात मतदारसंघात जी काही कामे केली आहेत ती विरोधकांना सरकार असतानाही दूरदृष्टी नसल्याने करता आली नाहीत.
विरोधकांनी मतदारसंघात कामे आणण्याऐवजी दादांनी आणलेली बहुतांश कामे अडवण्यात आणि मतदारसंघाचा विकास अडवण्यातच आपली सर्व शक्ती खर्च घातली. हे सर्व मतदार जाणून आहेत आणि त्याचा रोष ते मतदानातून व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. मतदारसंघातील विकासासाठी दादांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्व मतदार राजा जाणून असून आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व शेतकरी, युवक, विद्यार्थी, महिला, वृद्ध सर्व घटकांनी येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत दादांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निश्चय केला असल्याचे गोसावी यांनी म्हटले आहे.