राज्यात चारही चोर एकच आहेत, आपण सारे मावस भाऊ, वाटून वाटून खाऊ असेच चालले आहे. परंतु, खरोखर स्वाभिमानी माणसं बाहेर पडून जरांगे पाटील, बच्चुभाऊ कडू, संभाजी राजे पाटील, महादेव जानकर, राजू शेट्टी, वामनराव चटप साहेब, प्रकाश आंबेडकर या सर्व समविचारी वंचितांनी एकत्र येऊन ‘परिवर्तन महाशक्ती आघाडी’ स्थापन केली आहे.
त्यामुळे कर्जत- जामखेडकरांना पर्यायी तिसरा उमेदवार मिळणार आहे. मग तो अंबादास पिसाळ असो किंवा कैलास शेवाळे असोत किंवा इतर कोणताही पर्याय उपलब्ध होणार आहे, नव्हे झालेलाच आहे. त्यामुळे या दोघांचीही बत्ती गुल होऊ शकते. निवडून कोण येईल हे आताच सांगता येणार नाही, घरचा का बाहेरचा ते जनता ठरवेल.
- संजय तोरडमल, बहिरोबावाडी