कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक येथे नागरिकांना शनिवारी रात्री बिबट्या आढळून आला. तीन दिवसांपासून कर्जत येथील वन विभागाला माहिती देऊनही अधिकाऱ्यांकडून कसलीच दखल घेण्यात आली नसल्याचे सरपंच पूजा सूर्यवंशी यांनी म्हटले होते.
मात्र बिबट्याने शनिवारी दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण तयार झाले. त्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला. चांदे बुद्रुक येथे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी पिंजरा लावला आहे.