कर्जत जामखेडमधील शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्याने आ. रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचे दिसत आहे.
कर्जत- जामखेड मतदारसंघाची २०२४ ची विधानसभेची निवडणूक ही आमदार रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामामुळे आणि सर्वसामान्य जनतेची केलेली कामे यामुळे आम्ही आ. पवार यांच्या सोबत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आ. राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला वैतागून शिंपोरा, खेड, कवडगाव या गावातील भाजपच्या पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. आ. रोहित पवार यांनी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, युवा नेते मंगेश आजबे यांच्यासह हरिश्चंद्र भोईटे, बंटी चोरखले, सलाउद्दीन सय्यद, दत्तू भोरे, बलभीम चोरखले, संपत ढेपे, आबासाहेब येवले, जालिंदर शेगडे आदी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.