कर्जत तालुक्यातील कोरेगाव हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठे गाव आहे. येथील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत. वीज हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लाईट गेल्यानंतर लगेचच तांत्रिक बिघाड झाल्यास वायरमन किरण अडसूळ हे त्वरित दुरुस्ती करतात. मात्र, काही कारणाने त्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची उणीव जाणवू लागली आहे. कोरेगाव एजी आणि कोरेगाव गावठाण या दोन्ही लाईनची जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे सांभाळली होती. दोन्ही लाईन कुठे जातात हे त्यांना पाठ होते, आणि लाईटमध्ये बिघाड झाल्यास ते त्वरीत दुरुस्त करून लाईट सुरू करत असत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे लोक त्यांना सहकार्य करत, आणि या सहकार्याचा आदर ठेवून ते स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अडचणी सोडवत असत. त्यांनी कधीही कोणाकडून एकाही रुपयाची अपेक्षा ठेवली नाही, तरीही काही नाठाळ लोकांनी खोटे अर्ज करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
अडसूळ यांची शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणून ओळख होती. त्यामुळे कोरेगावकर व शेतकऱ्यांच्या वतीने स्वराज शेळके वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करीत आहेत की त्यांनी यामध्ये लक्ष घालावे व लवकरात लवकर किरण अडसूळ यांना कोरेगाव रूटवर पुन्हा कार्यरत करावे.
राहुल अडसूळ, तालुका प्रतिनिधी