शंभू मसाले यांच्या शिपी आमटी मसाल्याचे लॉन्चिंग सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी चार वाजता, तनपुरे सुपर मार्केट, कुळधरण रोड, कर्जत येथे होणार आहे. भाजप नेते पै. प्रविण दादा घुले यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० लिटर तयार केलेली आमटी लोकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
दैनंदिन जीवनात मसाले भाजी बनवण्यासाठी आवश्यक असतातच. कर्जत शहरात नावाजलेली शिपी आमटी ही कर्जतकरांची आवडती बनली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, शंभू मसाले यांनी उत्कृष्ट गुणवत्ता व दर्जा राखत स्पेशल शिपी आमटी मसाला तयार केला आहे.
त्यांच्या इतर मसाल्यांमध्ये किचन किंग मसाला, गोडा मसाला, हळद पावडर, स्पेशल मिरची पावडर, धना पावडर, कांदा-लसूण मसाला, संडे मसाला, पनीर मसाला, बिर्याणी मसाला, मटण मसाला, चिकन मसाला, काळा मसाला, खडा मसाला, कोल्हापुरी स्पेशल तांबडा-पांढरा मसाला, फिश फ्राय मसाला, आणि गरम मसाला नेहमी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांचा विश्वास जपून आणि मागणी लक्षात घेऊन त्यांनी हा स्पेशल शिपी आमटी मसाला तयार केला आहे.
राहुल अडसूळ, तालुका प्रतिनिधी