
निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते अनिल गदादे यांची भाजपाच्या कर्जत तालुका मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना, त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे.

२०१५ मध्ये भाजपचे १३ नगरसेवक निवडून आले होते, त्यातील अनेकांनी आमदार प्रा. राम शिंदे यांची साथ सोडली. मात्र, अनिल गदादे व नगरसेविका राणीताई गदादे यांनी शिंदे यांच्यासोबत निष्ठा कायम राखली.
गदादे यांच्या नावावर भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकमुखी मोहोर उमटवली. यात अंबादास पिसाळ, काकासाहेब तापकीर, अशोकराव खेडकर, प्रवीण घुले, प्रकाश शिंदे, झरकर बाबा, शिवाजी अनभुले, दादासाहेब सोनमाळी, अल्लाउद्दीन काझी, शांतीलाल कोपनर, कैलास शेवाळे, मंगेश जगताप, डॉ. सुनील गावडे, संपतराव बावडकर, काकासाहेब धांडे, पप्पूशेठ पांडुळे, नितीन खेतमाळीस आणि नंदू नवले यांचा समावेश आहे.