खेड विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण ; विद्यार्थ्यांना निकालपत्रांचे वितरण

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेतील सेवानिवृत्त सेवक विठ्ठल भिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, रमा सप्तर्षी, मुख्याध्यापक गोरक्ष भापकर, सुरेश पवार, माजी पंचायत समिती सदस्य मारुती सायकर, ‘युक्रांद’चे कमलाकर शेटे, संस्थेतील शिक्षक व उपस्थित पालकांच्या हस्ते निकालपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रवीण सप्तर्षी, रमा सप्तर्षी, विठ्ठल भिसे यांनी मनोगते व्यक्त केली. शैक्षणिक संकुलातील कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक तात्याराम गावडे यांनी केले. मुख्याध्यापक गोरक्ष भापकर यांनी आभार मानले.