सचिन पोटरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

कर्जत : प्रा. किरण जगताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “संकल्प ते सिद्धीपर्यंत” या सूत्रावर आधारित विविध जनसंपर्क व विकासाभिमुख उपक्रम देशभर राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतून कर्जत शहरात अभिनव वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या वाढदिवसानिमित्त, प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान कर्जत व शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसानिमित्त ७ जून रोजी सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत हा उपक्रम संपन्न झाला.

सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने सुमारे दीड लाख वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. कर्जत शहराला हरित व स्वच्छ बनवण्याचा उद्देश या मागे आहे. या उपक्रमाला साथ देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आ. शिवाजीराव कर्डीले, आ. मोनिकाताई राजळे, आ. विक्रमसिंह पाचपुते आदींच्या मातोश्रींच्या नावे हे वृक्षारोपण करण्यात आले.

या अनोख्या उपक्रमासाठी सर्व मान्यवरांची उपस्थिती होती. या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सचिन पोटरे यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे, अनिल गदादे, विनोद दळवी, सुनील यादव, सुनील शेलार , रवींद्र सुपेकर, प्रशांत शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.