कोरेगावच्या कृष्णा शेळके यांची महसूल सहाय्यकपदी निवड

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील शहाजी शेळके यांचे चिरंजीव कृष्णा शेळके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे. कृष्णा शेळके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा कर्जतमध्ये राजेंद्र गुंड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अशोक जायभाय, काकासाहेब धांडे, बबन नेवसे, इकबाल काझी, शहाजी शेळके उपस्थित होते. कर्जत तालुक्यामध्ये कृष्णा शेळके यांचे सर्व स्तरावरून […]

Continue Reading

‘द लुकस फॅमिली सलून अँड ॲकडमी’चे हभप माऊली महाराज पठाडे यांच्या हस्ते उद्घाटन

व्यवसाय आणि क्षेत्र कोणतेही असो त्यात कठोर परिश्रम व प्रामाणिक मेहनत केल्यास त्याची भरभराट- प्रगती निश्चित होते. ग्राहक हा राजा असतो. त्याचे समाधान त्या व्यावसायिकाचे ध्येय असते. जो हा मूलमंत्र आत्मसात करतो तो यशाच्या सर्वोच्च स्थानावर जातो असे प्रतिपादन हभप माऊली महाराज पठाडे यांनी केले. ते कर्जत येथील ‘द लुकस फॅमिली सलून अँड ॲकडमी’ नूतन […]

Continue Reading

राजे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुरगावमध्ये ‘छावा’चे मोफत प्रदर्शन

कर्जत तालुक्यातील दूरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी रात्री ८ ते १०.३० या वेळेत छावा चित्रपटाचे भव्य मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हा चित्रपट आठ बाय बारा फुटांच्या एलईडी स्क्रीनवर दाखवला जाणार असून दूरगाव येथील ग्रामस्थांना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहता येणार आहे. हा कार्यक्रम […]

Continue Reading

आदिवासी भिल्ल, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रश्नावर सभापतींना निवेदन

कर्जत तालुक्यातील आदिवासी भिल्ल, भटक्या विमुक्त जाती जमाती या समाजाचे लोक शासनाच्या जागेत सुमारे ५० ते ६० वर्षांपासून राहत आहेत. त्यांना निवाऱ्याची सोय नाही. हे लोक अनेक दिवसांपासून कच्च्या घरामध्ये राहत आहेत त्यांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना शासनामार्फत पक्की घरे व इतर सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत गरजा पूर्ण […]

Continue Reading

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा : सभापती प्रा. राम शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत यासाठी श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. चौंडी येथे श्री क्षेत्र चौंडी बृहत विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत […]

Continue Reading

शिंदे येथे ‘छावा’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन ; ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक पर्वणी

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे उद्योजक संदीपशेठ घालमे यांच्या वतीने गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ८ ते १०.३० या वेळेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर ‘छावा’ चित्रपटाचे भव्य मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आठ बाय बारा फुटांच्या एलईडी स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जाणार असून, शिंदे येथील ग्रामस्थांना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा आनंद मिळणार आहे. हा कार्यक्रम […]

Continue Reading

एचपी माऊली पेट्रो स्टेशनला एक महिना पूर्ण ; २.१० कोटींची उलाढाल

कर्जत येथील राशीन रोडलगत दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या माऊली पेट्रो स्टेशनला आज एक महिना पूर्ण झाला आहे. माऊली पेट्रो स्टेशनचे संचालक अक्षय राऊत यांनी या एक महिन्यात ग्राहकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व ग्राहकांचे आभार मानले आहेत. माऊली पेट्रो स्टेशनमध्ये पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एचपी पेमेंट अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यास […]

Continue Reading

कर्जत तालुक्यात आरटीई प्रवेशासाठी १२७ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. या अंतर्गत मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश दिला जातो. यासाठी लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी तालुकास्तरीय समिती काम करते. कर्जत तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी समितीकडून एकूण १२७ पात्र विद्यार्थ्यांच्या […]

Continue Reading

जगदंबा ट्रेडर्स अँड हार्डवेअर या नूतन व्यवसायाचा आज शुभारंभ

कर्जत तालुक्यातील कर्जत- नगर रोड येथील चांदे बुद्रुक चौक येथे मेजर विजय सूर्यवंशी यांच्या जगदंबा ट्रेडर्स अँड हार्डवेअर या नूतन व्यवसायाचा भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन आज मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. या दुकानात हार्डवेअरचे सर्व साहित्य उपलब्ध असणार आहेत. सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील, पत्रे, सिमेंट, […]

Continue Reading

‘आर्यन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर’चे मंगळवारी उद्घाटन 

कर्जत येथील कुळधरण रोड येथे संचालक सुनिल ढिसले यांच्या ‘आर्यन इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर’ या नूतन व्यवसायाच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. या दुकानात सर्व प्रकारचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्राहकांना सोयीस्कर खरेदी करता येणार असून, या सुविधेचा त्यांना […]

Continue Reading