लक्ष्यवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत भांबोऱ्याच्या अथर्व बनकरचे यश

कर्जत : प्रा. किरण जगताप

लक्ष्यवेध फाउंडेशनच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भांबोरा येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी अथर्व मनोज बनकर याने १५० पैकी १४४ गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक संजय मिसाळ तसेच शिक्षक भास्कर ठुबे, सूर्यकांत वाघमारे, नाना काळे, मनोज बनकर, शितल देशमुख आणि दिपाली बेलेकर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.

त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश लोंढे, उपाध्यक्ष सचिन माने तसेच सर्व सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले. या स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर यश मिळविल्यामुळे अथर्वचे शैक्षणिक क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.