
कर्जत तालुक्यातील हंडाळवाडी शिवारातील एका विहिरीत ४० ते ५० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विहीर मालक अनिल नवनाथ बंडगर यांनी तात्काळ कर्जत पोलिसांना माहिती दिली.

मृत व्यक्तीचे वर्णन असे : चेहरा – गोल, रंग – निमगोरा, डोक्यास केस – अर्धटक्कल, दाढी : काळी पांढरी, शरीर – सडपातळ, उंची – ५ फूट ६ इंच, कपडे – अंगात गोल गळ्याचा निळ्या रंगाचा हाफ बाहीचा टी शर्ट व निळ्या रंगाची अंडरवेअर.
मृतदेह विहिरीत आढळल्याने अपघाती मृत्यू झाला की घातपात झाला, याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे हंडाळवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृतदेहाची ओळख पटल्यास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव ( 9524429191 ) पोलीस नाईक श्याम जाधव ( 98500 86100 ) यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.