कोरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे सालाबादप्रमाणे दि. २१ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विठ्ठल–रुक्मिणी अखंड हरिनाम सप्ताह तसेच संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. व्यासपीठ चालक भजनसम्राट हभप धोंडीराम शेटे कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह दरम्यान दररोज महाराष्ट्रातील नावाजलेल्या विविध कीर्तनकारांचे जाहीर […]

Continue Reading

मिरजगावमध्ये नायटा व गजकर्ण मुक्त अभियानाचे आयोजन

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील डॉ. संतोष संभाजी बोरुडे यांच्या ओम हॉस्पिटल येथे नायटा व गजकर्ण मुक्त अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान बुधवार दि. ४ मार्च ते ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे. या शिबिरामध्ये नायटा, गजकर्ण, तोंड येणे तसेच विविध त्वचारोगांवर अत्यंत अल्प दरात उपचार उपलब्ध […]

Continue Reading

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकदिवसीय जिल्हास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. “महापुरुषांचे कार्य विवेचन” हा कार्यशाळेचा मुख्य विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. प्रविण सप्तर्षी होते. प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. आप्पा अनारसे व प्रा. […]

Continue Reading

पुस्तकासमोर नतमस्तक व्हा ; तरुणांनी सुवर्णकाळाचा सदुपयोग करावा : सविता गोलेकर

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्याख्यात्या सविता गोलेकर म्हणाल्या की, युवा पिढी ही समाजाचा केंद्रबिंदू आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना भरकटू नये. मौजमस्ती […]

Continue Reading

खेडमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात

कर्जत तालुक्यातील खेड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्राचार्य डॉ. दिलीपसिंह निकुंभ यांनी मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यवैभव आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित केला. प्रा. शिवगुरु व्हंडकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाचे महत्त्व […]

Continue Reading

धालवडी- राक्षसवाडी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी धालवडीचे रमेश पवार

धालवडी- राक्षसवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी धालवडी येथील रमेश गहिनीनाथ पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड तालुका दूध संघाचे चेअरमन व मार्केट कमिटीचे संचालक मंगेश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. रमेश पवार यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व सोसायटी सदस्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या माध्यमातून सोसायटीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल तसेच शेतकरी व […]

Continue Reading

मुलाच्या स्मरणार्थ गोमातेसाठी एक दिवसाचे पालकत्व

मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे बारडगाव येथील मोहन बाबुराव गावडे यांनी आपल्या दिवंगत सुपुत्र कै. सुहास गावडे (कारभारी) यांच्या स्मरणार्थ एक आदर्श उपक्रम राबविला. राशीन येथील यशोदानंद गोशाळा येथे गोमातेसाठी चाऱ्याची व्यवस्था करून त्यांनी एक दिवसाचे पालकत्व स्वीकारले. कै. सुहास गावडे (कारभारी) यांच्या अकाली निधनामुळे गावडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या दुःखात […]

Continue Reading

काष्टीतील टॉपर्स अकॅडेमीचे ‘जेईई मेन्स – २०२६’ मध्ये दैदीप्यमान यश

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या ‘जेईई मेन्स २०२६’ (सत्र १) परीक्षेत टॉपर्स अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.या परीक्षेत शिवम शितोळे (९८.९९), आर्या शेळके (९८.९३) आणि मयूर यादव (९८.९२) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडेमीचा लौकिक वाढवला.तसेच द्रोण लगड, अनुराधा हराळ आणि भूमी काळे या विद्यार्थ्यांनी ९८ पेक्षा […]

Continue Reading

रेखा चव्हाण कोरेगावकर यांना महाराष्ट्र कला भूषण पुरस्कार जाहीर

अकोले तालुक्यातील देवठाण येथे लोककलेचा भव्य जल्लोष अनुभवायला मिळणार असून सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी रेखा चव्हाण कोरेगावकर यांना यंदाचा महाराष्ट्र कला भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा पुरस्कार लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान केला जाणार आहे. दि.१ मार्च २०२६ रोजी आयोजित लोककला महोत्सवात सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे सहसचिव संदिप […]

Continue Reading

कोरेगावच्या जैनब शेखचा राज्यात प्रथम क्रमांक

सांगली येथे सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता २ रीतील विद्यार्थिनी जैनब फतेहमोहम्मद शेख हिने आपल्या उल्लेखनीय यशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत […]

Continue Reading