कर्जत- जामखेड मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणुकीत आ. प्रा. राम शिंदे हेच विजयी होतील, असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय नलवडे यांनी व्यक्त केला आहे. नलवडे म्हणाले, आ. राम शिंदे हे विकासाभिमुख व सर्वसमावेशक नेतृत्व आहे. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन, सर्वांना एकत्रित करून काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व संपूर्ण मतदारसंघातील जनतेमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण करत आहे.
कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे ते एक लोकप्रिय आणि प्रेरणादायी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते एकजुटीने त्यांच्यापाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे येथील जनतेने वेळोवेळी अनुभवलेले आहे. प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत- जामखेड मतदारसंघात विकासाची गती अधिक वेगाने वाढली आहे. त्यांच्या कामाची परिणामकारकता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन हा त्यांच्या यशाचा मुख्य घटक आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच यादीत प्रा. राम शिंदे यांचे नाव समाविष्ट झाल्याने त्यांची राजकीय ताकद अधिक ठळकपणे समोर आली आहे. मतदारसंघातील भूमिपुत्र असल्याने त्यांना स्थानिक प्रश्नांची नेमकी जाण आहे. येथील शेतकरी, व्यापारी, तरुण आणि महिलांचे प्रश्न ते बारकाईने समजून घेतात आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करतात.
प्रा. शिंदे यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्याविषयी प्रचंड विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत- जामखेड मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाच्या वाटचालीला चालना देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. अशा प्रभावी आणि सर्वसमावेशक नेतृत्वामुळेच आ. प्रा. राम शिंदे यांचा विजय निश्चित आहे, असे नलवडे यांनी म्हटले आहे.