बुधवारी महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आज कर्जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली. कर्जत तालुका प्रमुख बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटी परिसरात ही बैठक संपन्न झाली. यावेळी कर्जत तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे एकमताने बैठकी ठरले.