भाजपाच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी सचिन कांबळे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर येथील सचिन महादेव कांबळे यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आ. प्रा राम शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडेकर आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती-जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण उर्फ राहुल जनार्धन लोंढे यांच्या हस्ते कांबळे यांना हे निवड पत्र प्रदान करण्यात आले.

निवड

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब धांडे, कोरेगावचे सरपंच बापू शेळके, प्रकाश काका शिंदे, शहाजीराजे भोसले, विलास अप्पा निकत, पप्पू धोदाड, उदयसिंग परदेशी, बापूराव ढवळे, संतोष निंबाळकर, राहुल लोंढे ,दत्ता नलवडे, विश्वास शिंदे, बजरंग कदम, दत्ता मुळे, निळकंठ शेळके, हनुमंत नवसरे, दीपक रुपनर, कालिदास गरड, सतीश कोकाटे, मनोज होले, निलेश बागल, महादेव कटारे, महेश कांबळे, भैरू चव्हाण, महादेव कांबळे, अजित अनारसे, दादा डिसले व सुनील साठे आदी उपस्थित होते.

सचिन कांबळे यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांवरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यांना मिळालेल्या संधीचे रूपांतर पक्षाचे काम वाढविण्याच्या दृष्टीने कांबळे हे चांगल्या प्रकारे काम करतील आणि आपले नाव तालुक्यात चांगल्या प्रकारे निर्माण करतील. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राहुल अडसूळ, तालुका प्रतिनिधी