
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत दादा पाटील महाविद्यालयाने यशाची परंपरा राखली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे. दिक्षा नानासाहेब जाधव (८९.६७%), साक्षी आजीनाथ मोहळकर (८६%), श्रावणी तानाजी निंबाळकर (८५.६७ %) या विद्यार्थिनींनी विज्ञान शाखेत गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत.

वाणिज्य शाखेचा निकाल ९९.०८ टक्के लागला असून त्यातील तीन प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असे आरती विजय शिंदे (८६.३३%), सानिका रामभाऊ बोबलट (७९.१७%), ऋतिका शिवलाल नेटके (७७.८३%) तसेच कला शाखेचा निकाल ७५.७८ टक्के लागला असून त्यातील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी करण संजय काळे (८४%), ऋतुजा सतीशसिंग परदेशी (८२.६७ %), सुहानी अनुरथ साळवे (८१.६७%) हे ठरले आहेत. किमान कौशल्य अभ्यासक्रम निकाल ८१.८१ टक्के लागला असून त्यातील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी दिग्विजय रमेश जगताप (६०%), निखिल नाना भवर (५८.८३%), निकिता संतोष कवडे (५७.१७%) हे ठरले आहेत.
यावर्षीच्या परीक्षा सीसीटीव्ही कॅमेराच्या दक्षतेत घेण्यात आल्या. कॉपीमुक्त परीक्षा याबाबतीत महाविद्यालयाने चोख धोरण राबविले. ब्रिज कोर्स, क्रॅश कोर्स व वर्षभर जादा तासिका, उन्हाळी वर्ग, विद्यार्थ्यांचे तज्ञांद्वारे केले गेलेले समुपदेशन आदी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. सर्व सहकारी प्राध्यापकांनी त्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. त्यामुळेच हे यश प्राप्त झाले असून, गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न स्वीकारता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची दादा पाटील महाविद्यालयाची परंपरा व मिळालेले हे उत्तुंग यश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.