
कर्जत शहरामध्ये वटपौर्णिमा व माजी नगराध्यक्षा उषाताई अक्षय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वडाची रोपे व इतर १११ देशी रोपांची झाडे १७१८ दिवस अविरत श्रमदान करत असलेल्या सर्व सामाजिक संघटनेला देण्यात आली.

यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार उपस्थित असताना उषा राऊत यांनी कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, पावसाळा सुरू झाला असल्याने आपल्या घराच्या परिसरात किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. तसेच कर्जत शहरातील नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा.

उषा राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचा इतर खर्च टाळून अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले. अनेक सामाजिक उपक्रम करून उषा राऊत यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी