
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे खरीप हंगाम मोहीम सन २०२६ अंतर्गत शेतकरी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजी शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी शिवाजी शेळके यांनी हुमणी कीड व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, बीज प्रक्रिया, घरगुती चाचणी पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, हिरवळीच्या खतांचा वापर तसेच एल निनो परिस्थितीबाबत जागरूकता या विषयांवर सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी महाविस्तार ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांबाबत शंका निरसन करून घेतले.

यावेळी कोरेगावचे सरपंच विनोद मुरकुटे, उपसरपंच रोहिदास अडसूळ, माजी सरपंच काकासाहेब शेळके, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण मुरकुटे, अजित फाळके, ज्येष्ठ नेते चंद्रकांत नेटके, सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊसाहेब अडसूळ, मोहन अडसूळ, सुभाष अडसूळ, विठ्ठल अडसूळ, बापू अडसूळ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

