
भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील यादव यांचा आज वाढदिवस ! वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शेतकरी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवार यांनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुनील यादव हे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे आणि त्यांच्या अडचणी तत्परतेने सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शेती, वीज, पाणी, रस्ते, कर्ज तसेच इतर कोणताही शेतकरी प्रश्न असो तो तातडीने मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. विशेषतः वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांवर त्यांनी अनेकदा प्रशासनाशी संवाद साधून त्वरित उपाययोजना करण्यास भाग पाडले आहे. “एक फोन कॉल आणि काम सॉल” अशी त्यांची कार्यशैली असल्याचे कार्यकर्ते आणि शेतकरी आवर्जून सांगतात. कोणत्याही समस्येवर तत्काळ प्रतिसाद देऊन संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत प्रश्न सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न कायम असतो.
सामाजिक प्रश्नांबाबतही ते नेहमीच संवेदनशील भूमिका घेतात. एखाद्या शेतकऱ्याकडे वाहनाचा हप्ता वसूल करण्यासाठी अधिकारी किंवा संबंधित संस्था पोहोचल्यास त्या शेतकऱ्याची परिस्थिती समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत न्याय मिळवून देण्यासाठी ते पुढे सरसावतात. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व परशुराम हराळ यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. सामाजिक कार्य आणि शेतकरी हितासाठी त्यांची सेवा अशीच अखंड सुरू राहो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

शुभेच्छुक : परशुराम हराळ
प्रा. राम शिंदे कट्टर समर्थक
भारतीय जनता पार्टी टाकळी खंडेश्वरी

