आरोग्य विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी : महेंद्र बागल

कर्जत : प्रा. किरण जगताप

आरोग्य विमा क्षेत्रात करिअर घडविण्यासोबतच समाजसेवेचे महत्त्वपूर्ण कार्य करण्याची उत्तम संधी उपलब्ध असून परिसरातील युवक-युवतींनी या क्षेत्रात पुढाकार घ्यावा असे आवाहन बागल सर्व्हिसेसचे संचालक महेंद्र बागल यांनी केले.

यावेळी बोलताना महेंद्र बागल म्हणाले की वाढत्या आरोग्य खर्चाच्या पार्श्वभूमीवर हेल्थ इन्शुरन्सची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार आणि व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर चांगले करिअर घडविण्यासह आकर्षक उत्पन्नही मिळविता येते.

ते पुढे म्हणाले की बागल सर्व्हिसेसच्या माध्यमातून इच्छुक युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण, व्यवसायाचे मार्गदर्शन तसेच प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाते. आरोग्य विम्याबाबत जनजागृती करत नागरिकांना आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्याचे कार्यही या क्षेत्रातून करता येते.

परिसरातील युवक-युवतींनी रोजगाराच्या नव्या संधींचा लाभ घेत स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे. हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी बागल सर्व्हिसेसशी संपर्क साधून मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महेंद्र बागल यांनी केले.