लक्ष्मण आप्पा निक्षे यांची लहूजी शक्ती सेनेच्या कर्जत तालुकाध्यक्षपदी निवड

कर्जत : प्रा. किरण जगताप

लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक लहूश्री विष्णू भाऊ कसबे तसेच प्रदेश महासचिव बालाजी भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण आप्पा निक्षे यांची लहूजी शक्ती सेनेच्या कर्जत तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लक्ष्मण आप्पा निक्षे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर कर्जत तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ही नियुक्ती ६ ऑगस्ट २०२६ पासून एक वर्षासाठी वैध राहणार आहे.

या निवडीबद्दल सुनील शिंदे, फुलचंद लोंढे, रमेश सकट, भाऊसाहेब रंगनाथ निक्षे, विनोद लोंढे, कार्तिक खुडे, पवन खुडे, भाऊसाहेब कोंडीबा निक्षे, सूरज चव्हाण, प्रवीण चव्हाण, नितीन पवार, अतुल पवार, दादा केंदळे, मंगेश केंदळे, महादेव केंदळे, रामा केंदळे, उज्ज्वला भवाळ, सुनीता भवाळ, गणेश डाडर, नाना उकीरडे, सुशांत उकीरडे, अजय गायकवाड, कृष्णा गायकवाड, बळीराम गायकवाड, जयसिंग गायकवाड, सतीश गायकवाड, आनंदा निक्षे आणि रोहिदास निक्षे यांनी लक्ष्मण आप्पा निक्षे यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.