
कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रामा अजिनाथ माने, वय 35, रा. माऊलीनगर, ता. पाटोदा, जि. बीड यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास मिरजगाव परिसरातील माहिजळगाव ते श्रीगोंदा रोडवरील माहिजळगाव शिवारात ही घटना घडली. राम अजिनाथ माने हे MH 42 H 4986 क्रमांकाच्या ईको वाहनातून प्रवास करत असताना मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत वाहन चालविताना आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शिवराज पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मिरजगाव पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक दहिफळे करीत आहेत.


