आ. रोहितदादांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज : बाळासाहेब कोऱ्हाळे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार हे मतदार संघासाठी लाभलेले एक समाजशील नेतृत्व आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघाबरोबरच राज्यातील जनतेच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. त्यामुळे आपण खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, रोहितदादा यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. त्यांनी जनतेबरोबरच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनेक प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले कार्यकर्ते हेही समाजाला उपयोगी असे काम करत आहेत. आ. रोहितदादा यांचे स्पष्ट विचार लोकांच्या मनाला भिडतात. ते सामान्य लोकांच्या समस्या समजून घेतात आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात. विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनसेवेचे काम उभारलेले आहे. त्यामुळे रोहितदादा पवार हे एक आदर्श लोकप्रतिनिधी ठरले असून ते समाजाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत असल्याचेही कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.