आरोग्य सेवेसाठी तत्पर – थोरात हॉस्पिटल

कर्जत : प्रा. किरण जगताप

नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी थोरात हॉस्पिटलने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संचालक डॉ. महेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरानजीक वालवड रोडवर हे हॉस्पिटल अत्याधुनिक फिजिओथेरपी, न्यूरो रिहॅब सेंटर आणि जनरल केअर हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे.

थोरात हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या आजारांवर तज्ञ उपचार उपलब्ध आहेत. मानेची आणि कमरेची चकती सरकणे, मणक्यात गॅप येणे, गुडघेदुखी, संधिवात, खांदेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, पॅरालिसीस आणि चेहराचा पॅरालिसीस यांसारख्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी येथे विशेष उपचार पद्धती वापरल्या जातात. याशिवाय, सर्दी, खोकला, ताप, टायफाईड, डेंगू, मलेरिया आणि फंगल इन्फेक्शन यांसारख्या साधारण व संसर्गजन्य आजारांवरही येथे खात्रीशीर उपचार केले जातात. त्वचाविकार आणि स्त्रीरोगांवरही येथे तज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार दिले जातात.

रुग्णांच्या पुनर्वसनासाठी अत्याधुनिक न्यूरो रिहॅब सेंटरमध्ये तज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जातात, जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी मदत मिळू शकते. फिजिओथेरपीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांचे स्नायू आणि सांधे यांच्या समस्या सोडवल्या जातात. थोरात हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्तीसाठी देखील विशेष उपचार दिले जातात. दारू किंवा इतर नशेच्या सवयीपासून सुटका करण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार प्रक्रिया राबवली जाते.

सर्व उपलब्ध सुविधांबाबत माहिती देताना डॉ. अमृता थोरात म्हणाल्या, ‘आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य समस्या आणि आजारांवर उपचार केले जातात. रुग्णांच्या सेवेत सतत तत्पर राहून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच आमचे ध्येय आहे. आम्ही सर्वसामान्यांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

या प्रकारच्या व्यावसायिक बातम्या अल्प दरात प्रसिद्ध करण्यासाठी तात्काळ व्हाट्सअप संपर्क करा  : 7030952275