सद्गुरू उद्योग समूहातर्फे दिवाळी बोनसचे वाटप

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत येथील सद्गुरू उद्योग समूहातर्फे विविध व्यवसाय केले जातात, जसे सद्गुरू डेअरी, दूध संकलन, दूध शीतकरण, पेट्रोलियममध्ये श्री शिवशंकर पेट्रोलियम कर्जत, अरणगाव; बँकिंगमध्ये सद्गुरू मल्टीस्टेट कर्जत, माहीजळगाव; श्री संत गजानन महाराज पतसंस्था मिरजगाव; सद्गुरू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट कर्जत; श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान मिरजगाव संचालित सद्गुरू कृषी महाविद्यालय; श्री शिवशंकर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय; कृषी डिप्लोमा, डेअरी डिप्लोमा; ज्युनिअर कॉलेज मिरजगाव आणि श्री संत गजानन महाराज ज्युनिअर कॉलेज कर्जत येथे चालवले जातात. या सर्व संस्थांतील पदाधिकारी, कर्मचारी यांना सद्गुरू उद्योग समूहातर्फे दीपावली पर्वातील वसुबारसच्या शुभमुहूर्तावर गाय व तिच्या वासराचे पूजन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवाळी बोनस व फराळाचे वाटप करण्यात आले.

उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. शंकरशेठ नेवसे, अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, संचालक सिद्धांतसेठ नेवसे, प्रतीक्षाताई नेवसे यांच्या हस्ते व मातोश्री जनाबाई नेवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

शुभेच्छा देताना डॉ. शंकरसेठ यांनी पुढील वर्षी बोनसबरोबर उत्कृष्ट कर्मचारी व उत्कृष्ट प्रशासक निवडून त्यांना पगाराच्या 50% इतका बोनस जाहीर करण्याचे आश्वासन दिले आणि कर्मचाऱ्यांकडून उत्तम कामाची अपेक्षा व्यक्त केली. सचिव राजेंद्र गोरे यांनी उद्योग समूहाच्या भरभराटीसाठी सदिच्छा व्यक्त केली व कर्मचाऱ्यांची संख्या काही हजारावर जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कल्याणीताई यांनी शुभेच्छा देताना उद्योग समूहातील अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतो, अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, एम. डी. रवीराज थोरा, मॅनेजर हेबाडे, श्री. उबाळे, प्रा. चांगदेव माने, प्रा. राहुल मेहेत्रे, प्रा. यशवंत शिंगाडे, प्रा. विनोद शिंदे, प्रा. अनिल चौरे यांनी बोनस दिल्याबद्दल उद्योग समूहाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश पाठक साहेब यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. पूजा इनामके यांनी केले, आणि आभार प्रदर्शन प्रा. भगवान सागळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शिवसृष्टी या वास्तूच्या प्रांगणात सायंकाळी मंगलमय वातावरणात स्नेहभोजनाने झाली. उपक्रमाची संकल्पना सिद्धांत नेवसे आणि प्रतीक्षा नेवसे यांनी मांडली व या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कष्ट घेतले. परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.