कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात आ. रोहित पवार यांना उपराकार लक्ष्मण माने यांच्या ‘भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र’ यांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे.
जामखेड येथील जाहीर सभेत कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्रचे सरचिटणीस नारायण जावलीकर व महाराष्ट्र उपाध्यक्ष रामकृष्ण माने यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्या आदेशानुसार आ. रोहित पवार यांना पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एकत्र येऊन काही रक्कम जमा केली होती. परंतु उपराकार माने यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की गेली पन्नास वर्षे राष्ट्रीय नेते माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्यासोबत काम केले असून यापुढेही इमाने इतबारे तन मन धनाने त्यांच्या बरोबर निवडणूक प्रचारामध्ये काम करायचे आहे. तरी हा जमवलेल्या निधीचा वापर प्रतिगामी शक्तींना पराभूत करण्यासाठी करावा असे आवाहन केले.