आ. रोहित पवार हे कर्जत- जामखेड तालुक्याच्या विकासाची ‘पॉवर’ : बाळासाहेब कोऱ्हाळे

कर्जत : प्रा. किरण जगताप

आ. रोहितदादा पवार हे केवळ नावापुरते नेते नाहीत, तर त्यांनी आपल्या कामातून जनतेच्या मनात एक विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत- जामखेड तालुका विकासाच्या नव्या शिखरांवर जाणार आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्णत्वास येत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे तालुक्यातील विकासाच्या गतीला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यामुळे कर्जत जामखेडच्या विकासाची ते पॉवर आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दुधोडी येथील कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे, उजनी बॅकवॉटरवरील बंधाऱ्याचे काम हे तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा नियमित होईल. त्यामुळे कृषी उत्पादनातही मोठी वाढ होईल, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध योजना आणि औद्योगिक विकासाचे प्रयत्नही सुरू आहेत. बेरोजगारीच्या समस्येला आ. रोहित पवार यांनी नेहमीच गांभीर्याने घेतले आहे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

राज्यातील विविध प्रश्नांवर ते नेहमीच आवाज उठवत आले आहेत. त्यांनी वारंवार सांगितले आहे, सत्तेत बदल करूनच सामान्य जनतेला न्याय मिळू शकतो. त्यासाठी लोकांनी एकत्र येऊन, भाजपाला सत्तेवरून हटवण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे. आ. रोहित पवार यांच्याकडे सर्वसामान्य जनतेचा अपार विश्वास आहे, जो त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर आणि प्रामाणिक कार्यावर आधारित आहे. हा विश्वासच त्यांच्या यशाचे प्रमुख कारण आहे. लोकांच्या पाठिंब्याने ते पुन्हा विधानसभेत पोहोचतील आणि तालुक्याचा विकास हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट राहील. त्यांच्यामुळे केवळ कर्जत- जामखेडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, अशी जनतेला आशा आहे.

आ. रोहित पवार यांचे ध्येय केवळ राजकारणात टिकून राहणे नसून, समाजसेवेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हे आहे. त्यांच्या विकासदृष्टीमुळे कर्जत- जामखेड हे तालुके विकासाच्या एका नवीन पर्वाकडे वाटचाल करत आहेत.