कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील राहुल अडसूळ हे अपंग व्यक्ती आहेत. त्यांना अजिबात चालता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर जाता आले नाही. आठ ते दहा दिवसांपूर्वी त्यांचा सर्वे केला होता व घरी येऊन त्यांचे मतदान घेतले जाईल असे सांगण्यात आले होते.
पण मतदानादिवशी त्यांचे मतदान घेण्यासाठी कोणीही आले नाही. सरकारने अपंग, वृद्ध व्यक्तींसाठी त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेणे ही योजना काढलेली आहे. पण सर्वे करून सुद्धा या अपंग व्यक्तीचे मतदान करून घेण्यात आले नाहीत. कर्जत- जामखेड मतदारसंघातील अपंग, वृद्ध अशा किती व्यक्ती असतील, त्यांची सुद्धा मते बुडले असतील. यापुढे प्रशासनाने अपंग, वृद्ध व्यक्तींचे बारकाईने लक्ष देऊन मतदान करून घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर सोनवणे यांनी केली आहे.
राहुल अडसूळ, कोरेगाव