
कर्जत येथील कोटा मेंटॉर्स विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयाने यंदाही गुणवत्ता यादीत आपले नाव कोरले आहे. या उज्वल यशाने विद्यालयाचा गौरव होत आहे.

विद्यालयातील वैष्णवी नानासाहेब सुपेकर हिने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. दूर्वा राजाराम माने हिने ९४.४० टक्के मिळवत द्वितीय तर पुष्कराज महेश पठाडे याने ९४.२० टक्के संपादन करत विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला. ८५ टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यालयातील एकूण ३७ विद्यार्थी आहेत. या परीक्षेत एकूण ६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षकांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशात पालकांचे, शिक्षकांचे व संस्थेच्या मार्गदर्शनाचे मोठे योगदान आहे असे मुख्याध्यापकांनी म्हटले आहे.