
सदगुरु ग्रामविकास प्रतिष्ठानच्या कर्जत येथील फाळके पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी मिळाली आहे. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली यांच्याकडून संस्थेला शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ पासून विविध डिप्लोमा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.

ही अभ्यासक्रम सुविधा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. मंजुरी मिळालेल्या शाखांमध्ये खालील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Artificial Intelligence & Machine Learning
Civil Engineering
Computer Engineering
Electrical Engineering
या शैक्षणिक यशाचे सर्व श्रेय हे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या दूरदृष्टी, प्रभावी नेतृत्व आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाबाबतच्या सकारात्मक दृष्टिकोनाला जाते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही नवी संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली आहे. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे हेच पात्रतेचे निकष आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावाजवळच उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण घेण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतील. या उपक्रमामुळे कर्जत व परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून, शिक्षण क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.