कर्जत तालुका आरएसपी अधिकाऱ्यांकडून पोलीस निरीक्षकांचा सत्कार

कर्जत : प्रा. किरण जगताप

महाराष्ट्र राज्य गृह विभाग (पोलीस) व शिक्षण विभागाच्या अधिकाराअंतर्गत कर्जत तालुक्यातील ६ आरएसपी अधिकाऱ्यांनी पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. उपजिल्हा समादेशक प्रकाश मिंड, तालुका समादेशक अभिमन्यू बेरगळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनमध्ये नवनियुक्त आरएसपी अधिकाऱ्यांनी पोलीस रिपोर्टिंग फॉर्म एकत्रितरित्या जमा केला.

यावेळी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी बालवयात विद्यार्थ्यांवर वाहतूक नियंत्रण, नागरी संरक्षण, अग्निशमन सेवा, प्रथमोपचार आणि आकस्मिक सेवा या अतिशय महत्त्वाच्या समाजोपयोगी बाबींचा संस्कार होऊन भावी काळातील स्वयंशिस्त असणारा भावी नागरिक घडणार आहेत असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी उपजिल्हा समादेशक प्रकाश मिंड, तालुका समादेशक अभिमन्यू बेरगळ व कैलास काकडे, कय्यूमपाशा मोमीन, सुनील गोरखे, मच्छिंद्र कांबळे, संजय मडके आणि उमेश आखाडे या नवनिर्वाचित आरएसपी अधिकाऱ्यांच्या हस्ते नव्याने हजर झालेले कर्जत तालुका पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करताना पोलीस विभागाच्या वाढत्या जबाबदाऱ्या, अतिरिक्त कामाचा ताण पाहता आरएसपी अधिकाऱ्यांच्या वतीने प्रामाणिकपणे वाहतूक नियंत्रण, गर्दी नियंत्रण व आपत्कालीन सेवेसाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रकाश मिंड यांनी केले. शिक्षण, संस्कार आणि शिस्तीच्या माध्यमातून भावी पिढी घडविणाऱ्या आरएसपी अधिकाऱ्यांचे पोलीस विभाग, शालेय शिक्षण आणि समाज यांच्या वतीने प्रत्यक्ष भेटून किंवा समाज माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे.