सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कुळधरण गटातील शाळा होत आहेत डिजिटल

कर्जत : प्रा. किरण जगताप

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिकर पद्धतीने शिक्षण घेता यावे तसेच शहरी भागातील शिक्षण पध्दती ग्रामीण भागात यावी याच उद्देशाने व सभापती प्रा. राम शिंदे यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाण असल्याने यापूर्वीच कर्जत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये डिजीटल पॅनल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दरम्यान कुळधरण भागातील अनेक शाळांमध्ये डिजीटल पॅनल मिळाले नव्हते ही बाब वेळोवेळी लक्षात आणून देत दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी कुळधरण जिल्हा परिषद गटातील नांदगाव येथील निंबाळकर बागलवस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल पॅनल उपलब्ध करून देण्यात आले.

यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी मदत होणार आहे. या उपक्रमाचे ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. राम शिंदे यांचे नांदगाव ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहे.

यावेळी कर्जत तालुका दूध संघाचे संचालक दादासाहेब निंबाळकर, सरपंच गोरख बागल, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड, आण्णा बागल, माजी ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब गुंजाळ, रामदास निंबाळकर, बिभिषण निंबाळकर, सतिष निंबाळकर, पृथ्वीराज निंबाळकर, मयूर निंबाळकर आणि लालासाहेब जगताप उपस्थित होते.