
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील डॉ. संतोष संभाजी बोरुडे यांच्या ओम हॉस्पिटल येथे नायटा व गजकर्ण मुक्त अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान बुधवार दि. ४ मार्च ते ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे.

या शिबिरामध्ये नायटा, गजकर्ण, तोंड येणे तसेच विविध त्वचारोगांवर अत्यंत अल्प दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच औषधे व रक्त तपासणीवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या भेटी, ॲडमिट सुविधा व २४ तास सेवा उपलब्ध आहे. तसेच स्त्रीरोग तपासणी व उपचार, बालरोग तपासणी, डेंगू, गोचीडताप, टायफाईड, चिकनगुनिया, मलेरिया, कावीळ उपचार, मुतखडा व मुळव्याध उपचार, वजन वाढवणे व कमी करणे उपचार, वाफ देणे, संधिवात, मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी व उपचार, तसेच पोटाचे विविध विकारांवर उपचार आदी सुविधा येथे दिल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


या हॉस्पिटलचे ठिकाण नगर–सोलापूर रोड, बस स्टँड जवळ, मिरजगाव येथे आहे. अधिक माहितीसाठी ९९७५१५०९९६ व ९८३४२२९७९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


