
आरोग्य सेवांच्या वाढत्या खर्चामुळे येत्या काळात हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बागल सर्विसेसचे महेंद्र बागल यांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिना संपण्यापूर्वी आपल्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आरोग्य सेवांचा खर्च सातत्याने वाढत असल्याने विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढत आहे. तसेच हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीमध्ये झालेल्या बदलांमुळे कंपन्यांना इनपुट टॅक्सचा भार स्वतः उचलावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांकडून प्रीमियम दर वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे असेही बागल यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की नागरिकांनी आताच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यास कमी प्रीमियममध्ये अधिक फायदे मिळू शकतात. शक्य असल्यास तीन वर्षांचा प्रीमियम एकत्र भरून पॉलिसी घेण्याचा पर्याय निवडावा. त्यामुळे पुढील तीन वर्षांपर्यंत प्रीमियम वाढीचा परिणाम होणार नाही.

हेल्थ इन्शुरन्स घेताना अनुभवी कंपनीची निवड करणे तसेच आपल्या परिसरात अधिक कॅशलेस सुविधा असलेल्या रुग्णालयांशी संलग्न असलेल्या कंपनीची पॉलिसी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. बागल सर्विसेसच्या माध्यमातून सध्या बाजारात सुमारे १५० ते २०० हेल्थ प्लॅनर कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून घेतलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींसाठी भविष्यात क्लेमच्या वेळी ग्राहकांना टेन्शन-फ्री सेवा देण्याची आणि क्लेम सेटल करण्यासाठी पूर्ण मदत करण्याची जबाबदारी आमच्या टीमकडून घेतली जाईल असेही बागल यांनी म्हटले आहे.




