
बागल सर्विसेस टीमने २०२५–२०२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत २८ सदस्यांना आंतरराष्ट्रीय ट्रिपसाठी पात्र ठरवून मोठे यश मिळवले आहे. या यशस्वी सदस्यांना दुबई, मलेशिया, बुडापेस्ट (हंगेरी), रशिया, डेन्मार्क आणि इंडोनेशिया या देशांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. टीमच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि मजबूत टीमवर्क हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत.

तसेच बागल सर्विसेसचे प्रमुख महेंद्र बागल यांच्या प्रभावी मार्गदर्शन व प्रेरणेमुळे टीमने ही उल्लेखनीय झेप घेतली असल्याचे सांगण्यात आले.
या यशाच्या जोरावर टीमने चालू वर्षासाठी आणखी मोठे लक्ष्य निश्चित केले आहे. १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तिकिटे क्वालिफाय करून टीममधील जास्तीत जास्त सदस्यांना या यशाचा भाग बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

या यशामुळे टीममधील सदस्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यात आणखी मोठी उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वजण अधिक उत्साहाने काम करत असल्याचे टीमकडून सांगण्यात आले.

