बागल सर्विसेसचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर ; ६ ॲडव्हायझर्सची रशिया व इंडोनेशिया ट्रिपसाठी निवड

कर्जत : प्रा. किरण जगताप

बागल सर्विसेस टीमने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत JFM कालावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कालावधीत टीममधील तब्बल ६ ॲडव्हायझर्सनी आंतरराष्ट्रीय रशिया व इंडोनेशिया ट्रिपसाठी क्वालिफाय होण्याचा मान मिळवला आहे. या यशस्वी ॲडव्हायझर्समध्ये निलेश सुपेकर, ज्ञानेश्वर बागल, सागर डाळिंबे, संकेत आजबे, संतोष देशमुख आणि हर्षदा तोरडमल यांचा समावेश आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे बागल सर्विसेसचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले असून परिसरात सर्वत्र कौतुकाची लाट पसरली आहे. सहकारी तसेच ग्राहकांकडूनही या यशस्वी ॲडव्हायझर्सवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी बागल सर्विसेसचे प्रमुख महेंद्र बागल यांनी सर्व ॲडव्हायझर्सचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की ही केवळ सुरुवात आहे. पुढील काळात आणखी मोठ्या यशासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायचे आहेत. तसेच त्यांनी सर्व टीम मेंबर्सना प्रेरणा देत अधिकाधिक लोकांपर्यंत विमा सेवा पोहोचवण्याचे आवाहन केले.