नांदगावचे उपसरपंच विजय शिंदे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे ग्रामीण साहित्य संमेलन (दुसरे) या भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमात नांदगावचे उपसरपंच तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विजय शिंदे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, तानाजी दाडर, कवी नितीन चंदनशिवे आणि प्रसिद्ध कवयित्री शर्मिला गोसावी यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संमेलनाचे संयोजक प्राचार्य डॉ. संजय नगरकर व तानाजी डाडर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते झाले. कवी नितीन चंदनशिवे, स्वागताध्यक्ष चैतन्य उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुरेश गोरखे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काळोखे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लोंढे, डॉ. बापू चंदनशिवे, सुनील गोसावी, भाऊसाहेब यादव, जगताप, यशवंत गायकवाड यांच्यासह अनेक साहित्यिक व मान्यवर उपस्थित होते.

शिंदे यांनी नांदगाव परिसरात शिक्षण, आरोग्य, सामाजिक जागृती, तसेच गरजू व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्यामध्ये युवकांना मार्गदर्शन, सामाजिक उपक्रमांचे आयोजन, गावातील मूलभूत सुविधांच्या उभारणीत सहभाग आणि जनजागृती मोहिमा यांचा समावेश आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संमेलनाच्या आयोजकांनी त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

हा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. यावेळी बाबासाहेब बागल, नानासाहेब म्हस्के, शिवसेना नेते अशोक वाळूंज, माजी सरपंच दादासाहेब निंबाळकर, माजी उपसरपंच, भाऊसाहेब गुंड, माजी उपसरपंच, अण्णासाहेब बागल, ग्रामपंचायत सदस्य, पप्पू जगताप, रावसाहेब बागल, भाऊसाहेब गायकवाड, आरपीआय अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संजय जगताप, एचडिएफसी अँग्री ऑफिसर नाना शिंदे, पुणे दिपक गायकवाड, मेघराज जगताप, भाऊसाहेब जगताप, रामदास जगताप, दादा लोंढे, संजय विटकर, श्रीराम जगताप, संदीप पवार, लालासाहेब जगताप, लखन शिंदे आणि शांतराम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्यातून समाजातील तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी अनेक मान्यवरांनी ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनासाठी अशा कार्यकर्त्यांची गरज अधोरेखित केली. तसेच साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण होऊन सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होते असेही सांगितले. शिंदे यांच्या या सन्मानामुळे नांदगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.