
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन कर्जत शहरात प्रथमच समीक्षा एंटरप्रायजेसतर्फे सर्व आवश्यक शालेय साहित्याचा संच होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जवळपास ३५ टक्के सवलतीसह शालेय साहित्याचे संच उपलब्ध होणार असून प्रत्येक संचासोबत आकर्षक व मजबूत स्कूल बॅग मोफत देण्यात येणार आहे.

समीक्षा एंटरप्रायजेसकडे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी संच उपलब्ध असून सुट्टे स्टेशनरी साहित्य देखील माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या संचामध्ये वह्या, चित्रकला वह्या, कलर बॉक्स, स्केच पेन, कंपास पेटी, बॉलपेन पॅकेट, पेन्सिल बॉक्स, फेविकॉल, प्लास्टिक फाईल, प्रोजेक्ट पेपर, स्केल, कलर पेपर सेट, एक्झाम पॅड, आलेख वही तसेच वर्गानुसार इतर आवश्यक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेपलर व पिन बॉक्स तर १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी बारकोड पेपर सेटही देण्यात येणार आहे.

मर्यादित संख्येत संच उपलब्ध असल्याने पालकांनी आपल्या मुलांसाठी लवकरात लवकर संच खरेदी करून या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
समीक्षा एंटरप्रायजेसचे ठिकाण युनियन बँकेसमोर, साई हॉस्पिटलच्या शेजारी कुळधरण रोड, कर्जत येथे आहे. अधिक माहितीसाठी विशाल मोहिते ९०९६६७११८१ व अक्षय मोहिते ७६२०७०१५१० यांना संपर्क करा.

