सुदर्शन कोपनर यांची भाजपा युवा मोर्चाच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कर्जत : प्रा. किरण जगताप

भाजपा युवा मोर्चा अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी सुदर्शन शांतीलाल कोपनर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुदर्शन कोपनर हे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच युवा कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

या निवडीबद्दल माजी खासदार सुजय विखे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सुदर्शन कोपनर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही कोपनर यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.

राहुल अडसूळ, कर्जत तालुका प्रतिनिधी