धडाडीच्या समाजसेविका सुनंदाताई अंबादास पिसाळ यांचा आज वाढदिवस

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणाऱ्या सुनंदाताई अंबादास पिसाळ यांचा वाढदिवस आज कर्जत शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध राजकीय, सामाजिक, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

सुनंदाताई पिसाळ या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अंबादास पिसाळ यांच्या सुविद्य पत्नी आहेत. अंबादास पिसाळ यांनी सहकार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या कार्याचा प्रभाव जिल्हाभर जाणवतो. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

अंबादास पिसाळ यांच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याला सुनंदाताई पिसाळ यांनी नेहमीच खंबीर साथ दिली आहे. स्वतः सामाजिक कार्यात सक्रिय राहून त्यांनी कर्जत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात विकासाभिमुख कामांना प्राधान्य दिले. महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून एक संवेदनशील व जनसामान्यांशी नाळ जोडलेली समाजसेविका म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निरोगी, सुखी व दीर्घायुष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

सुनंदाताई पिसाळ यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचा वाढदिवस कर्जत तालुक्यात आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.