
कृषी क्षेत्रात आपले कष्ट, प्रामाणिकपणा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेले कृषी क्षेत्रातील मोलवान हिरा अजित दोलताडे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्यावर नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी, शेतकरी बांधव आणि हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

शेती हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे माध्यम आहे या भावनेतून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नवीन संधी उपलब्ध झाल्या असून कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यास त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

त्यांच्या प्रामाणिक कार्यशैलीमुळे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या स्वभावामुळे त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतीच्या विकासासाठी घेतलेले विविध उपक्रम, शेतकऱ्यांशी असलेली आत्मीयता आणि समाजहिताची जपलेली बांधिलकी यामुळे त्यांच्याबद्दल सर्वत्र आदराची भावना व्यक्त केली जाते.
वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सामाजिक माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, निरोगी व आनंदी आयुष्यासाठी तसेच भविष्यातील सर्व वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
आपले कार्य असेच समाजहितासाठी सुरू राहो, कृषी क्षेत्रात नवनवीन यश संपादन करत शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होवो आणि आपल्या जीवनात सुख, समृद्धी व यशाची अखंड भरभराट होवो अशा शब्दांत हितचिंतकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
– राहुल दोलताडे

