जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष तान्हाजी चांडे यांचा वाढदिवस साजरा

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष तान्हाजी चांडे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावासह परिसरातील कार्यकर्ते, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

तान्हाजी चांडे हे सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक, राजकीय तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गावातील युवकांना एकत्रित करून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असल्याने परिसरात त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली जाते. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे.

वाढदिवसानिमित्त काही ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तसेच मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी तानाजी चांडे यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टीचे युवा नेते परशुराम हराळ यांनी तान्हाजी चांडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. तान्हाजी चांडे हे युवकांसाठी प्रेरणादायी नेतृत्व असून समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. आगामी काळात त्यांच्या हातून आणखी चांगले सामाजिक व राजकीय कार्य घडावे अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

शुभेच्छुक – परशुराम हराळ
प्रा. राम शिंदे कट्टर समर्थक भारतीय जनता पार्टी टाकळी खंडेश्वरी