दुधोडी- बेर्डी सोसायटीचा ठराव सभापती प्रा. राम शिंदे यांच्या बाजूने

कर्जत : प्रा. किरण जगताप

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी दुधोडी- बेर्डीच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती यांच्या बाजूने ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पुष्पा ज्ञानदेव जांभळे यांच्या नावाने हा ठराव संमत करण्यात आला आहे.

बैठकीदरम्यान उपस्थित संचालक व सभासदांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विकास, शेतकरी हिताचे निर्णय, सहकार क्षेत्राची बळकटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचा उल्लेख करत त्यांना आपला ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला.

या बैठकीस योगेश भोसले, प्रमोद भोसले, महादेव भोसले, हनुमंत भोसले आणि रवींद्र जांभळे यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी, संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकमुखाने ठरावास मंजुरी देत भविष्यातही विकासाभिमुख कार्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

ठराव मंजूर झाल्यानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या निर्णयामुळे परिसरातील सहकार चळवळीला अधिक बळ मिळेल तसेच शेतकरी व सभासदांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या ठरावाची परिसरात चर्चा असून सभासदांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.