निमगाव डाकू सोसायटीचा ठराव सभापतींच्या बाजूने

कर्जत : प्रा. किरण जगताप

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निमगाव डाकू संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बाजूने ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. श्रीकांत भोसले आणि विजू भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक संपन्न पार पडली. या बैठकीत अतुल शेंडकर यांच्या नावाने ठराव संमत करण्यात आला.

या बैठकीदरम्यान उपस्थित संचालक व सभासदांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विकास, शेतकरी हिताचे निर्णय, सहकार क्षेत्राची बळकटी आणि सर्वसामान्यांच्या पर्सनल बाबत त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचा उल्लेख करत त्यांना आपला ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला.

यावेळी सचिन भवर, सुधीर आरडे, धनंजय आरडे, बापू शेंडकर, आप्पा जाधव, दीपक गोरे, शहाजी जाधव, हनुमान भोसले, पंढरीनाथ कौचाळे, अतुल शेंडकर आणि किरण धावडे यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी, संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा ठराव मंजूर झाल्यावर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.