
कर्जत तालुक्यातील नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या सभेत भाऊसाहेब दादा म्हस्के यांच्या नावाचा ठराव सर्व संचालकांच्या एकमुखी संमतीने बिनविरोध मंजूर करण्यात आला. या बैठकीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या बाजूने हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेत उपस्थित सर्व सदस्यांनी ठरावाला उत्स्फूर्त पाठिंबा देत एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे सोसायटीच्या कार्यात एकोप्याचे व सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र दिसून आले.

या बैठकीत सोसायटीच्या विविध प्रशासकीय व विकासात्मक विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकरी सभासदांचे हित जपणे, संस्थेची आर्थिक प्रगती, पारदर्शक कारभार आणि सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी चेअरमन राऊसाहेब म्हस्के, संचालक बाळासाहेब निंबाळकर, बापूसाहेब बागल, गजेंद्र बागल, संजय घालमे, काकासाहेब गायकवाड, अनिल काळे, कविता बागल आणि गणपत गुंड उपस्थित होते.

