
कर्जत तालुक्यातील बाभूळगाव दुमाला येथील विठ्ठल कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बाजूने ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. संस्थापक मारुती गायकवाड, शिवाजी गायकवाड आणि वसंत माळवदकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक मतदान ठराव करण्यासाठी संचालक बैठक संपन्न पार पडली. या बैठकीत शिवसेना नेते बिभीषण महादेव गायकवाड यांच्या पत्नी माधुरी गायकवाड यांच्या नावाने ठराव संमत करण्यात आला.

या बैठकीदरम्यान उपस्थित संचालक व सभासदांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विकास, शेतकरी हिताचे निर्णय, सहकार क्षेत्राची बळकटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचा उल्लेख करत त्यांना आपला ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी चेअरमन बिभीषण गायकवाड, सचिव नानासाहेब वांजखडे, तुषार गायकवाड, भरत गायकवाड, भरत बहिर, प्रशांत गायकवाड, उद्धव माळवदकर, संगीता गायकवाड, हबा सरक, नामदेव घाडगे, वसंत माळवदकर, हनुमंत बारवकर, मंगलबाई गायकवाड आणि सुभाष चव्हाण उपस्थित होते.

